breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आयसीसीकडून दशकातील सर्वश्रेष्ठ टी 20 संघाची घोषणा; धोनी, कोहली, शर्मा यांची वर्णी

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ टी 20 संघाची घोषणा केली आहे. या संघात टीम इंडियाच्या सर्वाधिक खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसीने टीम इंडियाच्या एकूण 4 खेळाडू्ंना या संघात स्थान दिलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमरहाचा समावेश आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीलादेण्यात आली आहे.

टीम इंडियाच्या खेळांडूव्यतिरिक्त या संघात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर आयसीसीने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी 1 खेळाडूला संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, वेस्ट इंडिजच्या ‘युनिव्हर्सल बॉल’ ख्रिस गेल आणि ऑलराऊंडर कायरन पोलार्ड, तसेच श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्स आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानचा समावेश आहे.

आयसीसीच्या या टी 20 टीममध्ये एकूण 3 फुल टाईम बोलर आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. तर फिरकीपटू म्हणून अफगाणिस्तानच्या राशिद खानला संधी मिळाली आहे.

अशी आहे आयसीसीची दशकातील सर्वोत्कृष्ट टी 20 टीम : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, ख्रिस गेल, अॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डी व्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा.

दशकातील सर्वोत्तम वनडे टीम : रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हीलिअर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहिर आणि लसिथ मलिंगा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button