breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आज मास्टर ब्लास्टर सचिनचे 47 व्या वर्षात पदार्पण

मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लॉस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला वयाची 46 वर्ष पूर्ण केली. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाला कुठलंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यंदा देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती सचिनच्या जवळच्या मित्राने दिली आहे. ‘ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे, अशी माहिती सचिनच्या मित्राने दिली.

कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यावेळी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वास त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button