breaking-newsक्रिडा
अमेरिकन ओपन टेनिस : सेरेनाचे विजयी सातत्य कायम
न्युयॉर्क – अमेरिकेची टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सातत्य कायम राखताना आपल्याच देशाच्या स्लोनी स्टिफनचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिने तिसऱ्या फेरीच्या या सामन्यात स्टिफनचा 2-6, 6-2, 6-2 असा पराभव केला.
या सामन्यात प्रथमच सेरेनाला पहिला सेट गमवावा लागला होता. त्यानंतर मात्र, तिने आपला अनुभव पणाला लावून खेळ केला. तिच्या आक्रमकतेपुढे स्टिफन निरुत्तर झाली होती. तिला सेरेनाची सर्व्हिसही अनेकदा भेदता आली नाही.