अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धा: एक्सलन्सी ऍकॅडमी संघाला विजेतेपद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Excellence-Income-T.jpg)
पुणे: एक्सलन्सी ऍकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा 4-1 असा सहज पराभव करून अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. आजच्या सामन्यात एक्सलन्सीच्या युवराजने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना सामन्यात हॅटट्रीकची नोंद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे झालेल्या या स्पर्धेत एक्सलन्सी ऍकॅडमी संघाने क्रिडा प्रबोधिनी संघाचा 4-1 असा सहज पराभव केला. हर्ष परमार याने 21 व्या मिनिटाला गोल करून एक्सलन्सी ऍकॅडमी संघाचे खाते उघडले. फॉममध्ये असणाऱ्या युवराज वाल्मिकी याने चारच मिनिटांनी पुन्हा दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून वाल्मिकीने संघाची 3-0 अशी आघाडी वाढवली. वाल्मिकीने लागोपाठ तीन गोल नोंदवत आपल्या हॅट्रीककच्या जोरावर संघाला 4-1 असा विजय मिळवून दिला. तर, क्रिडा प्रबोधिनी संघाकडून रैस मयुवर याने 35व्या मिनिटाला त्यांच्या संघाचा सामन्यातील एकमेव गोल नोंदवला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार रणजीतसिंग मोहीते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवा संघटनेचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, रोहीत पवार, नगरसेवक राजु मिसाळ, विशाल शंकर वाकडकर, फिरोज शेख, वैशाली घोडेकर आणि सागर पुजारी यांच्या उपस्थितीत झाले.
वैयक्तिक पारितोषिकेः
मालिकेचा खेळाडूः युवराज वाल्मिकी (एक्सलन्सी ऍकॅडमी);
सर्वोत्कृष्ट रक्षकः रूबेन केदारी (एक्सलन्सी ऍकॅडमी);
सर्वोत्कृष्ट फॉवर्डः अंनिकेत गुरव (क्रिडा प्रबोधिनी);
सर्वोत्कृष्ट हाफः आशितोष लिंगे (आयकर विभाग संघ);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षकः जीवन शिंदे (क्रिडा प्रबोधिनी);
शिस्तशीर खेळाडूः तालिब शहा (क्रिडा प्रबोधिनी);