breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! मुलाने कानशिलात लगावली… आईने जागेवरच सोडला प्राण ( व्हिडीओ )

मुंबई |

देशाची राजधानी दिल्लीच्या द्वारका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईला इतकी जोरदार कानशिलात लगावली की वृद्ध आई खाली पडली आणि जागेवरच जीव सोडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, या घटनेत अवतार कौर या ७६ वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी महिला आणि तिच्या शेजार्‍यांमध्ये पार्किंगवरुन वाद झाला होता. शेजाऱ्याने पीसीआरवर कॉलही केला होता, परंतु पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर तक्रारदार महिलेने वाद मिटला असून पुढील कारवाई करायचं नसल्याचं सांगितलं आहे.

त्यानंतर मुलगा रणबीरने अवतार कौर यांना शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाबाबत विचारणा केली आणि त्यांच्यात बाचाबाचीला सुरूवात झाली. वाद वाढला आणि रागाच्या भरात मुलाने वृद्ध अवतार कौर यांच्या जोरदार कानशिलात लगावली. ही थापड इतकी जोरात होती की त्यानंतर कौर खाली पडल्या. त्यावेळी कौर यांती सून देखील तिथे होती. नंतर मुलाने आणि सुनेने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बिंदापूर पोलिसांनी कौर यांचा 45 वर्षीय मुलगा रणबीर याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button