breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे १५ प्रकल्प पूर्ण’; आयुक्त शेखर सिंह

शहर सल्लागार समितीची १३ वी बैठक संपन्न

पिंपरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहर सल्लागार समितीची स्थापन करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास कामांचे अनुषंगाने शहर सल्लागार समितीची तेरावी बैठक गुरूवार, दि. १८ रोजी आयुक्त यांचे दालनात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरातील सूरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी, खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे (ऑनलाईन), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (ऑनलाईन), सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, अमित तलाठी, सिटीझन फोरम अध्यक्ष तुषार शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी दिपक पवार, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मे. E&Y आणि मे. KPMG सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच, स्मार्ट सिटीची कामगीरी, मिळालेले पुरस्कार त्याचबरोबर प्रकल्पांच्या विकासाबाबत सल्लागार प्रतिनिधी यांनी पीपीटीव्दारे सादरीकरण केले.

हेही वाचा – सुषमा अंधारेंना मारहाण केल्यादा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी

स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, तिसऱ्या फेरीत समाविष्ठ झाल्यानंतरही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे प्रकल्प नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत. सध्या २० व्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड शहर असून एकूण २५ प्रकल्पांपैकी १५ प्रकल्प पूर्ण असून उर्वरित ९ प्रकल्पांचे ८० टक्के काम झाले आहे. इ- सर्व्हेलन्स हा प्रकल्प अत्यंत नाविन्य पूर्ण असून त्याद्वारे रस्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येणार आहे. जीआयएस प्रकल्पाद्वारे लिडार च्या माध्यमातून शहरातील उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकाम यांची माहिती संकलित करून यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. एकंदरीत गुगल मॅपप्रमाणे हे मॉडयूल काम करेल. म्युनिसिपल ई –क्लास रुम प्रकल्प मनपाच्या १२३ शाळांमध्ये राबविला आला असून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांचे धडे दिले जात आहे. वर्ग खोल्यांमध्ये स्मार्ट टीव्ही तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. आरटीफीशल इंटेलिजेंटचा उपयोग करून विद्यार्थी व शिक्षकांवर नजर ठेवली जाणार आहे. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इज्युकेशन सारथी सूरू करण्याचे नियोजन असून शाळांमध्ये १०० टक्के वॉटर फीटर बसविण्यात येणार आहे. शहरातील ६० पैकी ४७ व्हीएमडी कार्यरत आहेत. ९५ टक्के सिटी नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील १० पैकी ८ ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प देखील प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांनी मनपा शाळांच्या विकासाबाबत काही सूचना केल्या. ते म्हणाले की, मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शाळांमधील स्वच्छता, शौचालये, विद्यार्थ्यांच्या समस्या याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिल्ली, मुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दर्जा उंचावून शहरातील जास्तीत जास्त मुलांनी मनपा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे. तसेच, शहरातील नागरिकांच्या सूरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, असे श्रीरंग बारणे म्हणाले.

प्रसंगी उपस्थित सदस्यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या. सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button