Jawan Collection : शाहरूख खानच्या ‘जवान’ची रेकॉर्ब्रेक कमाई!

Jawan : अभिनेता शाहरूख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जवानला ७५ कोटींची ग्रँड ओपनिंग मिळाली आहे. अशाप्रकारे शाहरूखने त्याच्या मागील ‘पठान’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
जवान या चित्रपटात शाहरूख खानसोबत साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये दीपीका पदुकोणचा कॅमिओ आहे.
हेही वाचा – Pimpri-Chinchwad : चिंचवडमध्ये धावत्या कारने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली
BREAKING:- #SRK now has Top 2 slots to him for Hindi Box Office Day 1 Net Collections 🔥#JawanBoxOffice #JawanReview #Jawan #SRKian #ShahRuhKhan #Pathaan #SRKian #SRK𓃵 #Bollywood #KingKhan #bollywoodcelebrities #celebrity #JawanOnGoogle #ShahRukhKhan𓃵 #srkfan #ENTERTAINMENT pic.twitter.com/1M6vsSosLt
— Swarmayi Times (@swarmayi) September 8, 2023
बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, जवानने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये ७५ कोटींची कमाई केली आहे. फक्त हिंदीत जवानने ६५ कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीमध्ये सर्वात जास्त ओपनिंग करणारा जवान हा पहिला सिनेमा ठरला आहे. हिंदी व्यतिरिक्त जवानाने तेलुगू ५ तामिळ ५ मध्ये इतक्या कोटींची कमाई केली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.