शाहरूख खानचा सलमानला टोला? म्हणाला, मला चित्रपट हिट करण्यासाठी ईदला प्रदर्शित…

मुंबई : शाहरूख खानचा जवान सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाने देशभरातून ४०० कोटींहून जास्त कमाई केली आहे, तर जगभरातील चित्रपटाची कमाई ७०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. जवानच्या टीमने १५ सप्टेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शाहरूखने सलमान खानाला टोला लगावला आहे.
शाहरूख खानचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये माझा चित्रपट हिट व्हावा, यासाठी मला तो ईदला रिलीज करण्याची गरज नाही. जेव्हाही माझा चित्रपट प्रदर्शित होतो, त्या दिवशी ईद असते, असं शाहरूख म्हणाला. शाहरूखने नाव न घेता सलमानला टोला लगावलं असल्याचं म्हटलं जात आहे.
Hahaha what a shot by SRK! He said, I don’t need to release my film on EID to make it HIT. Whenever my Film does release, that day becomes EID. Budhaoo Ki Kahkar Leli.🤪😁 pic.twitter.com/02CWIMTg3n
— KRK (@kamaalrkhan) September 15, 2023
हेही वाचा – औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांच नाव अखेर बदललं; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
#WATCH | During the post-success event of Film Jawan in Mumbai, Superstar Shah Rukh Khan says, "We started on January 26, Republic Day (with Pathaan), then on Janmashtami we released Jawan, now New Year and Christmas are round the corner, we will release 'Dunki'…" pic.twitter.com/madJwwc25h
— ANI (@ANI) September 15, 2023
आम्ही २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन (पठाण) सुरुवात केली, त्यानंतर जन्माष्टमीला ‘जवान’ रिलीज केला, आता नवीन वर्ष आणि ख्रिसमस जवळ आले आहेत, आम्ही ‘डंकी’ रिलीज करणार आणि ज्या दिवशी माझा चित्रपट रिलीज होतो, त्यादिवशी ईद असते, असं शाहरूख म्हणाला.