‘भाजपाची ताकद फक्त गोमुत्र राज्ये जिंकण्यापुरतीच’; खासदार सेंथिलकुमार एस यांचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम) खासदार डी.एनव्ही सेंथिलकुमार एस यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपाची ताकद फक्त आम्ही गोमुत्र राज्य म्हणतो ती हिंदी राज्ये जिंकण्यापुरतीच आहे, असं सेंथिलकुमार एस यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
देशातील जनतेनं विचार केला पाहिजे की, भाजपाची ताकद फक्त हिंदी पट्ट्यातील राज्ये जिंकण्यापुरतीच आहे. ज्याला आम्ही गोमुत्र राज्ये म्हणून संबोधतो. तुम्ही (भाजपा) दक्षिण भारतात येऊ शकत नाही. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात काय झालं, हे सर्वांनी पाहिलंच आहे. आम्ही तिथे खूप मजबूत आहोत, असं सेंथिलकुमार एस म्हणाले.
हेही वाचा – मराठा आरक्षणसंदर्भात संभाजी छत्रपती यांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र
Chennai is sinking due to the misgovernance of DMK & and so is their level of discourse on the floor of the Parliament.
After calling our North Indian friends Pani Puri sellers, toilet constructors, etc., I.N.D.I. Alliance DMK MP, makes Gaumutra Jibes. @BJP4TamilNadu highly… pic.twitter.com/S13YzvDfsb
— K.Annamalai (@annamalai_k) December 5, 2023
दरम्यान, भाजपा खासदार जगन्नाथ सरकार यांनी सेंथिलकुमार एस यांच्या वक्तव्यावर टीका केली. भाजपाला देशाभरात स्विकारलं आहे. जो कुणी अशी वक्तव्य करत आहे, त्याला काहीच माहिती नाही. जनतेचा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त भारतीय नाही तर जागतिक नेते बनले आहेत, असं जगन्नाथ सरकार म्हणाले.