breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का? संजय राऊतांचं महत्वाचं विधान

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. या जागावाटपादरम्यान कोल्हापूरच्या जागेची सध्या विशेष चर्चा होत आहे. कारण या जागेवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. शिवसेनेची छत्रपती शाहू महाराज यांच्याशी लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. काँग्रेसने काय सांगितलं आहे हे आम्हाला माहिती नाही. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा करावी असं आम्हाला सूचवण्यात आलंय.

हेही वाचा      –      पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट!

कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे त्या जागेवरून तुम्ही मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी विनंती आम्हाला छत्रपतींना करावी लागेल. त्यांची मान्यता आहे का? हे आम्हाला विचारावं लागेल. कारण छत्रपतींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही यावर लोकांचे वेगवेगळे प्रवाह आहेत. आम्ही छत्रपतींना मानतो, त्यांच्या विचारधारेला मानतो. जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा. जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button