breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजितदादा, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ महदेव अ‍ॅपचे सदस्य’; संजय राऊतांचा मोठा आरोप

मुंबई : महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, बघेल यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, लालू् प्रसाद यादव एकदा म्हणाले होते की मी भाजपात गेलो असतो तर एव्हाना मी राजा हरिश्चंद्राचा अवतार झालो असतो, सत्यवादी झालो असतो. परंतु, मी भाजपात गेलो नाही, मी त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाहीत, म्हणून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कारवाई चालू आहे. महादेव अ‍ॅपचंही तसंच आहे.

हेही वाचा – ‘मराठा समाजाच्या तरूणांविरोधात ओबीसी नेत्यांचं षडयंत्र..’; मनोज जरांगे पाटीलांचा मोठा आरोप

भूपेश बघेल भाजपात गेले किंवा त्यांनी भाजपाला मदत केली तर भाजपात त्यांना देवाचं स्थान मिळेल. हे लोक महादेव अ‍ॅपचं ‘हर हर महादेव अ‍ॅप’ करतील. भूपेश बघेल यांच्यावर अभिषेक केला जाईल. हे अगदीच खरं आहे. तुम्ही हवं तर महाराष्ट्रात पाहा. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सुद्धा महादेव अ‍ॅपचे सदस्य आहेत. आता त्यांची पूजा करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार-भुजबळ-मुश्रीफांवर फुलं उधळत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

नुकतंच तुम्ही गोंदियात पाहिलं असेल. प्रफुल्ल पटेल यांनी तिथे नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. हे तेच प्रफुल्ल पटेल आहेत, ज्यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आरोप केले होते. इक्बाल मिर्ची आणि पटेल यांचे संबध जोडले होते. हेच प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उभे होते. मोदी आणि पटेल हे दोघे हातात हात घालून चालत होते. ही सगळी महादेव अ‍ॅपची कमाल आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button