ताज्या घडामोडीराष्ट्रिय

रशियन सैन्यातील 4 भारतीय नागरिक युद्धात मारले

मोदी सरकारने रशियन सरकारकडे केली मोठी मागणी

दिल्ली : रशिया आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन सैन्याने सुमारे 200 भारतीय नागरिकांना सैन्यात भरती करून घेतले. या युद्धात 4 भारतीय नागरिक मारले गेले आहेत. यावरून मोदी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी भारताने रशियन सैन्याला भारतीय नागरिकांची भरती करू नये. आम्ही भरतीवर सत्यापित बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे,’ असे सांगितले. आतापर्यंत 10 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. तसेच, रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांची लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परतण्याची परवानगी द्यावी अशी मागणीकेली आहे. हा मुद्दा रशियन सरकारकडे मांडला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रशिया-युक्रेन संघर्षात रशियन सैन्यात सेवा करणारे आणखी दोन भारतीय नागरिक मारले गेले आहेत आणि अशा मृत्यूंची संख्या चार झाली आहे. रशियन सैन्यात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांचा प्रश्न हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. आम्ही या मुद्द्यावर नवी दिल्ली आणि मॉस्को या दोन्ही ठिकाणी रशियाच्या संपर्कात आहोत. आम्हाला कारवाईची अपेक्षा आहे, असेही जैस्वाल म्हणाले.

प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, अलीकडेच ठार झालेल्या दोन भारतीयांचे मृतदेह त्वरित परत आणण्यासाठी भारत काम करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. यासोबतच त्यांनी फ्रेंच पत्रकार सेबॅस्टियन फार्सिस यांच्या त्यांना भारत सोडण्यास भाग पाडले गेले या दाव्याचे खंडन केले. ‘वर्क परमिट’च्या नूतनीकरणासाठी त्यांचा अर्ज विचाराधीन आहे. फार्सिस हे ओसीआय कार्डधारक आहेत. नियमानुसार त्यांना पत्रकारितेचे काम करण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाच्या ‘राष्ट्रीय सुरक्षेत’ भारतीय गुप्तचर यंत्रणा कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे जी काही कथित क्लीप बनविण्यात आली आहे ती निरलस खोटी आहे. डॉक्युमेंटरीमध्ये जे काही दाखविण्यात आले आहे ते भारताची बदनामी करण्याचा विशेष अजेंडा आहे असे दिसते. भारत कोणत्याही दहशतवादाला क्षमा देत नाही, त्याचे समर्थन करत नाही. अशा कोणत्याही प्रयत्नांना आमचा स्पष्ट विरोध आहे असे ते म्हणाले. भारताची बदनामी करण्याचे हे षड्यंत्र आहे असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button