breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रोहित पवारांचं अजित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले..

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमधील वैचारिक मंथन शिबिरात बोलताना आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष म्हणे… अरे कशाचा संघर्ष… कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, आता कशाचा संघर्ष करत आहात, असं अजित पवार म्हणाले. यावरून रोहित पवार यांनी अजितदादांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार म्हणाले, आदरणीय अजितदादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा ८०० किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत ५०० किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडीत आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.

हेही वाचा  –  इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी; पोस्टमध्ये #Melodi हॅशटॅग 

युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे. तर, युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल. परंतु, युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे. भाजपबरोबर गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा आहेत. तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button