breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पुणे : मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच, चक्रीवादामुळे महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ९ डिसेंबर दरम्यान पुढील ५ दिवस पावसाची शक्यता असून ५ ते ७ डिसेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तर ८ ते ९ डिसेंबरला हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे.

हेही वाचा  –  ‘भाजपाची ताकद फक्त गोमुत्र राज्ये जिंकण्यापुरतीच’; खासदार सेंथिलकुमार एस यांचं वादग्रस्त विधान

७ डिसेंबरपर्यंत राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button