breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज!

पुणे – राज्यात पुढील दोन दिवस पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्यानं पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button