breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

मुंबई : राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या केलेल्या सक्ती विरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारत दुकानांवर २ महिन्यांच्या आत मराठी भाष्ट्य पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला असून २ महिन्यांच्या आत दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत आहेत.

हेही वाचा – संसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण वाढले; उपाययोजना करा! 

सुप्रीम कोर्ट म्हणाले की, तुम्ही मराठी पाट्या का लावू शकत नाही? नियम पाळा. कर्नाटकातही हा नियम आहे. अन्यथा, मराठी फॉन्ट इतका छोटा, इंग्रजी फॉन्ट मोठा ठेवाल, यात मुलभूत अधिकारांचे उल्लंघन कुठे आहे? आता दिवाळी, दसऱ्याच्या आधी मराठी पाट्या लावण्याची वेळ आली आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात. तुम्हाला मराठी पाट्यांचा फायदा माहित नाही का? जर आम्ही तुम्हाला पुन्हा मुंबई हायकोर्टात पाठवले तर तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो अशा शब्दात कोर्टाने व्यापारांना फटकारले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button