Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एमआयटी कॉलेज, आळंदी येथे एआय व इंडस्ट्री 4.0 साधनांवरील कार्यशाळा उत्साहात

उद्योजकता व नवोन्मेषासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन; १३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे: आळंदी येथील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये “उद्योजक आणि नवोन्मेषकांसाठी एआय आणि इंडस्ट्री 4.0 टूल्स” या विषयावरील कार्यशाळा उत्साहात पार पडली. इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि स्टुडंट अफेअर्सच्या साय-टेक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेला डॉ. बी. बी. वाफारे आणि उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख वक्ते म्हणून सायबर चक्रा टेक्नॉलॉजीचे संस्थापक तथा आयआयटी कानपूर येथे इन्क्युबेट झालेल्या स्टार्टअपचे प्रमुख श्री. अभिषेक वाघमारे उपस्थित होते. ते कावच २०२३ राष्ट्रीय हॅकथॉनचे विजेते तसेच TEDx स्पीकर आहेत.

हेही वाचा –  ‘चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया’; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

 

श्री. वाघमारे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ऑटोमेशन आणि उद्योजकता यांचे आजच्या नवोन्मेषप्रधान युगातील महत्त्व स्पष्ट करत त्यांच्या प्रत्यक्ष उपयोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला. एकूण १३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. प्रीती भारंबे आणि डॉ. शीतल घोटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच IIC समन्वयक डॉ. संदीप दावले यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणारी ठरली असून नवोन्मेष आणि स्टार्टअप संस्कृतीकडे प्रेरित करणारी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता व इंडस्ट्री 4.0 साधनांचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक आहे. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची जाणीव निर्माण होऊन ते भविष्यात सक्षम उद्योजक व तंत्रज्ञ बनतील.”

– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button