#waragainstcorona : परराज्यातील नागरिकांना आपल्या घरी जाण्याची परवानगी : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
परराज्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील मजूर, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी परवानगी देण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मोबाईल क्रमांक संपूर्ण देशभर प्रसारित झाला आणि त्यांना अवघ्या काही तासांमध्ये एक हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. सर्व कामगार, मजूर, विद्यार्थी यांना त्यांच्या घरी पाठविण्याबाबत नेमके काय पावले उचलली आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. तीन ते चार मेल आयडी तयार करण्यात येत आहेत. त्यावर संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. लगेचच उद्यापासून रेल्वे, विमानसेवा किंवा बससेवा असे काहीही सुरू होत नाही. कोणीही पॅनिक होऊ नका. पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबतची सर्व माहिती देण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.