#War Against Corona : बालेवाडीगाव येथील दसरा चौकाजवळ गॅसच्या दुकानाला आग
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
बालेवाडीगाव येथील दसरा चौकाजवळ शुक्रवारी रात्री गॅस च्या दुकानास आग लागली. यावेळी गॅस सिलिंडर चे लागोपाठ ७ स्फोट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत एका दुकानांतून तब्बल ३१ गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढले आणि आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेमुळे त्या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बालेवाडी गावातील दसरा चौक भागात पत्र्याच्या शेड मध्ये सलग ५ दुकाने आहेत. शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानांना आग लागली. आणि एकापाठोपाठ सिलिंडरच्या स्फोट होण्यास सुरुवात झाली. हे आवाज ऐकून नागरिकांनी अग्निशमन नियंत्रण कक्षास संपर्क करून माहिती दिली. पाषाण अग्नीशमन केंद्राच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली. आग मोठी असल्याने कोथरूड आणि औंध केंद्राच्या गाड्याना पाचारण करण्यात आले. सिलिंडर चे स्फोट होत असल्याने अग्निशमन केंद्र प्रमुख शिवाजी मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली जवनानी तत्परतेने दुकानातील लहान मोठे ३१ सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला