#WAR AGAINST CORONA: पुण्यता आणखी तिघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ८ वर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/2-6.jpg)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुणे शहरात कोरोनामुळे एकाच दिवशी (मंगळवारी) तिघांचा मृत्यू झाला. आता शहरातील कोरोनामुळे मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील काही परिसर सील देखील केला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तिघांचेही वय हे 60 च्या पुढे आहे. मृत्यू झालेल्या दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, असे सांगीतले जात आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, कोरोनामुळं आज (मंगळवारी) तिघांचा मृत्यू झाल्यानं पुणे शहरात कोरोनामळं मृत्यू होणार्यांची संख्या आता 8 वर जाऊन पोहचली आहे. शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका परिवाराची काळजी घ्या असं आवाहन वेळोवेळी केलं आहे. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले असून पुणे पोलिसांनी त्यांची वाहने देखील जप्त केली आहेत.