breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona: चाकणमधील कामगारांना रेशनकार्ड आणि राशन मिळावे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

पुणे। महाईन्यूज । प्रतिनिधी

चाकण एमआयडीसी मध्ये अडीच लाख कामगार असून त्यांना रेशनकार्ड मिळावे व त्याद्वारे त्यांना राशन मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

करोना विषाणूच्या महामारीचा जिल्ह्यात आणि राज्यात मीठ प्रादुर्भाव झाला आहे या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आज माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील यांनी खेड पंचायत समितीमध्ये सभापती, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकार यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे,ज्योती अरगडे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांना सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी तालुक्यातील करोना विषाणूच्या आढाव्याची आतापर्यंतची माहिती दिली. खेड तालुक्यात करोना विषाणू चा प्रादुर्भाव नाही तरीही खबरदारी घेतली जात आहे. भोसरीच्या अंडी विक्रेत्याचा करोना पोझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर चाकण येथील ८५ दुकानदार व त्यांच्या कुटुंबातील सुमारे ३५० नागरिकांना कोरंटाईन केले आहे. याबरोबरच तालुक्यात बाहेरगावरून आलेल्या सुमारे २० हजर नागरिकांवर आरोग्य व पंचायत समितीचे लक्ष ठेवून आहे. आशा वर्कर्स ग्रामसेवक यांच्याकडून बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे त्यातील सुमारे १८ हजार नागरिकांना गावी आल्याचे १५ दिवस उलटले आहेत. त्यामुळे धोका टाळला आहे. अजूनही काही नागरिक मुंबई, पुणे सह परराज्यातून येत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवले आजच्या आहे. खबरदारीची सर्व उपाययोजना केली जात आहे. ३५ लिटर सँनेटायझर व मास्क उपलब्ध झाले आहे. शिवाय खाजगी कंपनीकडून तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध झाले आहे.

प्रशासनाच्या सूचना सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत. नागरिकांनी घरी थांबावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे.गर्दी करू नये. खेड तालुका कामगारव्याप्त तालुका आहे. अनेक कामगार अल्प पगारावर काम करत आहेत. कामगारांची संख्या जास्त आहे प्रशासनाही त्यांच्यावर पकड असल्याने करोनापासून लांब आहेत यात सर्वांचे योगदान मोठे आहे. अजूनही काही आवश्यक मदत असेल तर मदत केली जाईल अनेक कंपन्यांशी मी चर्चा केली होती. सीएसआर अधून मदत करावी. त्याला कंपन्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. चाकण परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे त्यांना घरपोच जीवनावश्यक साहित्य दानशूरांकडून दिले जात आहे मात्र ते आता अपुरे पडत आहे.  त्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. परराज्यातून आलेल्या कामगारांसह राज्यातील कामगारांना रेशनिंगचे धान्य मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असं माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button