breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित रक्तदान महायज्ञात १३२३ रक्तदान

पुणे : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सिंहगड भागाच्या वतीने सिंहगड रोड परिसरात १५ ठिकाणी हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञात १३२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले व ५००० नागरिकांनी या महायज्ञाला भेट दिली. यावेळी महिला आणि तरुणाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. यंदाचे सलग १० वे वर्ष होते.

यावेळी पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, विहिपचे केंद्रीय सत्संग सहप्रमुख दादा वेदक, भीमराव तपकीर, किशोर चव्हाण, वर्षा डहाळे, धीरज घाटे, रवी शिंगणापूरकर, रणजित नातू या मान्यवरांनी अनेक रक्तदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी भगरे गुरुजी म्हणाले की विज्ञानाने इतकी प्रगती करून हि कृत्रिम रक्त बनवता येत नाही. एखाद्या रुग्णास गरज भासल्यास राक्त दानच करावे लागते. त्यामुळे रक्तदानास श्रेष्ठदान म्हणले जाते. कोणतेही भेटवस्तूचे आमिष न देता खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीत शिकवले जाणारे दानाचे महत्व पटवून देण्याचे कार्य विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे या भागातील कार्यकर्ते करत असून भविष्यात समाजाने आणखी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक महिलांना रक्तदान करता न आल्याने सकस आहार घेण्याचे व आदर्श दिनचर्या अवलंविण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’कडे सोपवली काय? ठाकरे गटाचा हल्लाबोल

या महायज्ञात १०० हून अधिक गणेशोत्सव मंडळे, सोसायटी यांनी सहभाग घेतला. नवश्या मारुती परिसर, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, सुदत्त संकुल, विठ्ठल रखुमाई सोसायटी, आनंद नगर, वांजळे जलतरण तलाव, सनसिटी सोसायटी, माणिकबाग, वडगाव बु., नऱ्हे, धायरी, नांदेड, लगडमळा, अभिरुची मॅाल या १५ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कै. किशोरदादा गोसावी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा चषक यंदा वांजळे जलतरण तलाव केंद्रास सर्वाधिक रक्तदान केल्याबद्दल दिला गेला. हा चषक विश्व हिंदू परिषद, सिंहगड भाग अध्यक्ष शरद जगताप, उपाध्यक्ष शुभदा गोडबोले, अनिल रुपदे, उमेश पोकळे यांच्या हस्ते देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button