“वेहेरगाव” येथे जुगार अड्ड्यावर छापा
अंमली पदार्थ तसेच १० जुगाऱ्यांसह तब्बल "पाऊण कोटी"चा मुद्देमाल हस्तगत..
![Vehergaon, gambling, hideout, raid, Drugs, drugs, gambles, rs 1.5 crore, valuables, seizures,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/pune-2-780x470.jpg)
लोणावळा : ग्रामीण व शहरी विभागात कोणाताही अवैध व्यवसाय, कृत्ये करणाऱ्या “प्रत्येकाला धडा शिकवण्याचा विडा” उचललेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी पुन्हा एकदा दणका दिला असून अंमली पदार्थ,१० जुगारी यासह तब्बल पाऊण कोटीचा मुद्देमाल वेहेरगाव येथे हस्तगत करत संबंधितांच्या मुसक्या आवळल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली असून नुकतीच श्री एकवीरा गडाच्या पायथ्याशी धडाकेबाज कारवाई केली आहे.यावेळी कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी सोमवारी रात्री रात्री त्यांच्या पथकासह सापळा रचुन श्री एकवीरा देवीच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या मडवी यांच्या बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी इसम नामे, राहुल भरत इंगुळकर,रा. वाकसई ग्रामपंचायत शेजारी ता. मावळ जि.पुणे, संतोष ज्ञानदेव बोत्रे, रा. वेहेरगांव ता. मावळ जि पुणे, मंगेश विठ्ठल देशमुख रा.वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे,संजय विठ्ठल देशमुख रा.वेहेरगांव ता मावळ जि. पुणे,दिनेश पांडूरंग गायकवाड, रा.वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे, चंद्रकांत हौजी देवकर,रा.वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे, विनोद शरद नाणेकर , अजित सुनिल देवकर रा. वेहेरगांव ता. मावळा जि. पुणे. मंगेश मारुती राणे रा. कामशेत शिवाजी चौक ता मावळ जि. पुणे ,संतोष काशिराम दळवी रा. वेहेरगांव ता. मावळ जि. पुणे हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले. तसेच पंचासमक्ष पोलिसांनी वर नमूद आरोपींची झडती घेतली असता आरोपी नामे संतोष काशिराम दळवी वय ४५ वर्ष, रा वेहेरगांव ता. मावळ जि पुणे याने स्वतःचे पॅन्टचे खिशामध्ये २.३० ग्रॅम वजनाचे व रु.२०,३००/- एवढ्या किमतीचे एम.डी. पावडर हा नशाकारक अमली पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याचे मिळुन आले आहे. सदरच्या कारवाईमध्ये वर नमुद सर्व आरोपींचे ताब्यातुन रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण रु ७४,१४,०५०/- (अक्षरी चौऱ्ह्यातर लाख चौदा हजार पन्नास रुपये) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न.२४९/२०२४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ५. एन.डी.पी.एस.१९८५ चे कलम ८ (क) २१ (ब)
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांचे पथकाने केली आहे.
मावळातला नवा “सिंघम”:
सध्या सुरु असलेल्या कारवाईचा धडाका पाहता नव तरुण आयपीएस अधिकारी सत्य साई कार्तिक हे मावळचे नवे “सिंघम” बनले असून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या नंतर हे पहिलेच अधिकारी जनतेला लाभले आहे.