breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार

पुणे :  सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी  सिंहगड रस्त्यावर पाहणी करून केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.यानंतर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना कोंडी सोडविण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्याचबरोबर परिसरातील तीन चौकांतील सुधारणासंदर्भातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुढील दोन तीन दिवसांत महापालिका येथे सुधारणा, तसेच दुरुस्ती करणार आहे.

यामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी बऱ्यापैकी सुटण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या पाहणी वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी दीपक नागपुरे यांच्यासह स्थानिक नागरिकही उपस्थित होते.सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात ‘येथील नागरिकांना तास न् तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला होता. या पार्श्‍वभूमीवर मनोज पाटील यांनी भेट दिली.

हेही वाचा     –      ‘मुख्यमंत्री करणार म्हणाले असते तर पक्षच आणला असता’; अजित पवारांचं मोठं विधान 

मनोज पाटील यांनी सांगितले, की सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल चौक, हिंगणे जंक्शन आणि इनामदार चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथे उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे.या तिन्ही चौकांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात एक आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत या तीनही चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाईल, तसेच ज्या चौकांमध्ये दोन्ही बाजूस नो पार्किंग आहे,

त्या भागात पूर्ण रस्ताच नो पार्किंग करण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिवाय वाॅर्डनची संख्याही वाढविण्यात येणार आहे. काही चौकांतील सिग्नलचे वाहतूकीच्या अनुषंगाने सिंक्रोनायझेशनही केले जाणार आहे.तातडीने करावयाच्या उपाययोजनांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. ते पुढील दोन ते तीन दिवसांत सुचवलेल्या उपायोजना किंवा दुरुस्त्या करणार आहेत. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहनचालकांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button