Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; लोणावळा घाटात ४–५ किमी वाहनांच्या रांगा

Pune-Mumbai Expressway | पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून लोणावळा घाट परिसरात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात सुमारे ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन वाहतूक पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने वाहने सोडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा      :          PCMC | ८६० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने लोणावळ्यात झालेल्या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ एक्सवरुन शेअर केला आहे. घाटात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. अनेक वाहन चालक वाहनातून बाहेर येत वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. रामनवमी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button