पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेनिमित्त उद्या शहरातील वाहतुकीमध्ये बदल

पुणे : ‘पुणे ग्रँड टूर स्टेज सायकल स्पर्धा’ शुक्रवारी (२३ जानेवारी) शहरातील ५८ किलोमीटर मार्गावरून जाणार असल्याने पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल केले आहेत. स्पर्धेनिमित्त पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळांना दुपारी बारापर्यंत सुरू ठेवण्याचे किंवा शाळा प्रशासन स्तरावर वैकल्पिक सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून शुक्रवारी सुरू होणाऱ्या स्पर्धेचा पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात समारोप होणार आहे. ९५ किमी अंतराची ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा –टपाल कर्मचाऱ्यांना मिळणार २०० ई-बाईक्स, अमृता फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
नागरिकांनी स्पर्धेच्या मार्गावर कोणतेही वाहन उभे करू नये. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिकेड्स आणि स्टॉपलाइनच्या पाठीमागे थांबून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले. तसेच या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ध्यानात घेता पुणे महापालिका हद्दीतील सरकारी आणि खासगी शाळा दुपारी बारापूर्वी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे शाळा प्रशासन स्तरावर वैकल्पिक सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी १२ पोलीस उपायुक्त, १९ सहायक पोलीस आयुक्त, ७८ पोलीस निरीक्षक, २४३ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह ४ हजार ३८१ पोलीस अंमलदार असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुपारी १२ ते ४ या वेळात बंद ठेवण्यात येणारे रस्ते
- राधा चौक ते सुसखिंड रोड (बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड)
- पूनम बेकरी ते पाषाण सुस रस्त्याने पाषाण सर्कल
- पाषाण सर्कल ते एनसीएल, अभिमानश्री सोसायटी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते ब्रेमन चौक, राजीव गांधी पूल
- एस. बी. जंक्शन ते जे. डब्ल्यू. मेरिएट हॉटेल ते बालभारती ते पत्रकारनगर (सेनापती बापट रस्ता)
- पत्रकारनगर ते विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता ते शेलारमामा चौक, कर्वे रस्ता
- शेलारमामा चौक ते नळ स्टॉप, पौड फाटा ते कर्वे पुतळा
- कर्वे पुतळा ते डी पी रोड, सुतार हॉस्पिटल ते वनाज पौड रस्ता
- वनाझ रस्ता ते नळ स्टॉप चौक
- नळ स्टॉप चौक ते हुतात्मा रवींद्र म्हात्रे पूल, सेनादत्त पोलीस चौकी
- सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक (शास्त्री रस्ता)
- टिळक चौक ते चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौक (टिळक रस्ता)
- टिळक चौक ते शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक
- आप्पा बळवंत चौक ते हुतात्मा (बुधवार चौक) चौक, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर ते मंडई चौक, खडक पोलीस ठाणे ते राष्ट्रभूषण चौक
- राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक, ना. सी. फडके चौक
- ना. सी. फडके चौक ते सावरकर चौक (सारसबाग)
- सावरकर चौक ते मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चित्रपटगृह) मित्र मंडळ चौक
- मित्र मंडळ चौक ते ढोले-पाटील चौकक (सेव्हन लव्हज चौक), टिंबर मार्केट ते ए डी कँम्प चौक, नरपतगिरी चौक
- नरपतगिरी चौक ते बॅनर्जी चौक, नेहरू मेमोरियल हाॅल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा गांधी रस्ता, महावीर चौक ते इंदिरा गांधी चौक
- अर्जुन रस्ता ते राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी रस्ता जंक्शन
- घोरपडी जंक्शन ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक
- बोल्हाई चौक ते वीर जीवा महाले चौक (अपोलो चित्रपटगृह), दारूवाला पूल ते लाल महाल चौक
- लाल महल ते शनिवार वाडा, स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे)
- स. गो. बर्वे चौक ते सिमला ऑफिस (वेधशाळा)चौक, न. ता. वाडी चौक
- न. ता. वाडी चौक ते चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक ते तुकाराम पादुका चौक, नामदार गोखले चौक ते गरवारे उड्डाणपूल चौक
- गरवारे उड्डाणपूल चौक ते झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक (बालगंधर्व रंगमंदिर)




