breaking-newsपुणे
TikTok व्हिडीओमुळे पुण्यात बस चालकाने गमावली नोकरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-29.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
टिकटॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. या व्हिडीओमुळे अनेक जण अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका पीएमपी बस चालकाला महागात पडलं आहे. टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालकाला आपली नोकरी गमवावी लागल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएलच्या बस चालकाने टिकटॉकवर एक व्हिडीओ केला होता. कामावर असताना त्याने केलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. बस डेपोमध्ये त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. बस चालकावर प्रशासनाने निलंबन आणि चौकशीची कारवाई केली. त्यानंतर त्याला बडतर्फही केलं आहे.