येत्या गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण मात्र भारतातून दिसणार नाही
पुणे – या महिन्यात गुरुवार १० जून रोजी येणाऱ्या वैशाख अमावस्येदिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात मात्र कोठेही दिसणार नाही .त्यामुळे भारतातील जनतेने आणि प्रामुख्याने गर्भवती महिलांनी या ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत. त्याचप्रमाणे या ग्रहणाचे नैसर्गिक आणि राशी नुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशातील लोकांनी विचारात घेऊ नये असे आवाहन पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी केले आहे.
पंचागकर्ते गौरव देशपांडे यांनी पुढे असे म्हटले आहे की,भारत वगळता हे सूर्यग्रहण कॅनडा, रशिया आणि ग्रीनलँड मधील काही भागात कंकणाकृती स्वरूपात दिसणार असून न्यूयॉर्क,नॉर्वे ,रशिया, मंगोलिया, रशिया आणि कॅनडाचा काही भाग,
ग्रीनलँड, फिनलँड आणि चीनमधील काही भागात मात्र हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. न्यूयॉर्कमध्ये या ग्रहणावेळी ग्रहणस्पर्श वेळ- ०५:२५ EDT आणि ग्रहणमोक्ष वेळ-
०६:३१ EDT अशी असणार आहे.तसेच न्यूयॉर्क येथील ग्रहणाचा विचार केल्यास याठिकाणी हे सूर्यग्रहण ग्रस्तोदित स्वरूपात दिसणार असून या ग्रहणात सूर्यबिंबाचे ग्रासमान ९ आणि ३४ व्यंगुल इतके असणार असल्याचे गौरव देशपांडे यांनी म्हटले आहे.