breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पावसाचा जोर वाढला! प्रशासन अलर्ट मोडवर, एकतानगर भागात भारतीय लष्कर तैनात करणार

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी खडकवासला धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवल्याने सिंहगड परिसरातील अनेक सोसायट्यामध्ये पाणी शिरलं होतं, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर रात्री पुर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग वाढवला असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नदीतील विसर्ग वाढवण्यात आल्याने यावेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29414 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सकाळी 11:00 वा. 35002 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकता नगर भागात भारतीय लष्कर तैनात करण्यात येणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगर या भागात जवान तैनात करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही अडचण किंवा या भागात पुरस्थिती निर्माण होऊ लागल्यास तातडीने उपाययोजन करता येतील.

हेही वाचा –  ‘पुढचे तीन महीने मला द्या, मी तुम्हाला राज्यात तुमचं सरकार देतो’; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना थेट आश्वासन

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भारतीय लष्कराला  विनंती केली आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विसर्गामुळे हा घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रामध्ये होणार विसर्ग वाढवण्यात आला होता. यावेळी सिंहगड परिसरीतल अनेक सोसायट्यामध्ये पाणी शिरलं. अनेक वाहने पाण्यात बुडली. अनेकांच्या घरातील सामान वस्तू वाहून गेल्या. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते.

आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पवना धरण 92 टक्के भरलेले आहे. धरणाच्या सांडव्यावरून 1800 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे, तर जलविद्युत केंद्रामधून विद्युतग्रहाद्वारे 1400 क्युसेकने पाणी सोडले आहे, असे एकूण 3200 क्युसेकने इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सायंकाळी 7 वाजता सांडव्यावरून विसर्ग वाढवून 3600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29414 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सकाळी 11:00 वा. 35002 क्यूसेक्स करण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button