Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एमआयटी महाविद्यालयात “क्षितिज २०२६” सामाजिक स्नेहसंमेलन उत्साहात

पुणे : एम.आय.टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी, पुणे येथे वार्षिक सामाजिक स्नेहसंमेलन – क्षितिज २०२६ हे ३१ जानेवारी २०२६ व १ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना “जिंदगी का सफर” अशी होती. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक तोडमल (प्रेरणादायी वक्ते) उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय, आत्मविश्वास आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जमीर शिकलगर (क्रीडा प्रशिक्षक) लाभले. त्यांनी क्रीडा शिस्त, मेहनत व संघभावना यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या दोन दिवसांच्या महोत्सवात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, एकल नृत्य, एकांकिका (स्किट), एकल गायन, वाद्यवृंद (इन्स्ट्रुमेंटेशन) आदी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

हेही वाचा – शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती….

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात रंगला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे, उपसंचालक डॉ. मानसी अतितकर व डॉ. अक्षदा कुलकर्णी, स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. शरद कदम , कुलसचिव गौरव मगर तसेच सांस्कृतिक समन्वयक प्रा. मयुरी बापट यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळे “क्षितिज २०२६” हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला, याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button