Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून कुंभमेळ्यातील विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत.  या कामांचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कामांना भेटी देऊन कामाची गती व गुणवत्तेची पाहणी केली.

जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत असून या कामांना गती देण्यासाठी आणि कामांचे संनियंत्रण करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी सर्व यंत्रणांना कामांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे येथे बेलगाव कु-हे-नांदुरवैद्य-साकुरफाटा मार्गाची पाहणी केली. त्यांचेसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे होते.

डॉ.गेडाम यांनी रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या खडी, मुरुम व इतर साहित्याची पाहणी केली आणि त्यांचे नमुने घेतले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार यांचे अभियंते यांचे समक्ष काही साहित्याची मटेरियल टेस्टिंग व्हॅनमार्फत तपासणीही केली. तसेच या तपासणीचे अहवाल तातडीने मागविण्याच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात. घेतलेल्या नमुन्यासह त्यांनी नमुने परिक्षण प्रयोगशाळेलाही भेट देऊन माहिती घेतली.

हेही वाचा –  जपानमधील होक्काईडो प्रांताच्या उपराज्यपालांनी घेतली कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या रस्ते, पुल, घाट व इतर कोणत्याही कामात नियमानुसार आवश्यक तो दर्जा आढळून येणे आवश्यक असल्याचे त्यांनी यापूर्वीच सुचित केले आहेत.

कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाच्या साधनांची उपलब्धता राज्य शासन कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करून देत आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चाच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील रस्ते कामांचाही मोठा समावेश आहे. भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासााठी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत याकरीता या कामांचे संबंधित विभागामार्फत दैनंदिन पर्यवेक्षण करणे आवश्यक असून कामाच्या टप्प्यानुसार होत असलेल्या कामांचे छायाचित्र तसेच छायाचित्रण करण्याच्याही सुचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. दिलेल्या निर्देशानुसार कामे होत असल्याबाबतची खात्री करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष या कामांना भेटी देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते कामांचे वेळोवेळी पर्यवेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button