स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे : डॉ दिनेश डोके
![Society should come forward for the education of autistic children: Dr. Dinesh Doke](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-08-at-3.40.15-PM-780x470.jpeg)
पुणे : ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘आणि ‘ अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘ च्या नवीन शैक्षणिक सुविधा केंद्राचे उदघाटन राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.दिनेश डोके, ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘च्या संस्थापक डॉ अंकिता संघवी यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबर,शनिवारी सकाळी गणेशबाग सोसायटी (औंध ) येथे झाले.
अर्ली इंटरव्हेंन्शन प्रोग्राम फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘ , डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी च्या सर्वंकष शिक्षण (इन्क्लुझिव्ह एज्युकेशन) च्या सुविधा यावेळी कार्यान्वित करण्यात आल्या .
यानिमित्त ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘यांच्या वतीने शनिवारी दिवसभर ‘ सुपर हिरो कार्निव्हल ‘आयोजित करण्यात आला होता .२ ते १३ वर्ष वयातील बालके ,थेरपिस्ट आणि डॉक्टर्स त्यात सहभागी झाले. सुपरमॅन,बॅटमॅन,हल्क,आयर्न मॅन अशा सुपरहिरोंशी संबंधित मजेदार खेळांचा समावेश या कार्निव्हल मध्ये होता.
यावेळी बोलताना डॉ दिनेश डोके म्हणाले,’समाजात स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांची संख्या वाढते आहे.प्रत्येक ऑटिस्टिक मूल हे वेगळे असते,स्वतंत्र असते आणि त्याचे प्रश्न वेगळे असतात.त्यांना शिकवणे आणि काळजी घेणे हे फार मोठे आव्हान आहे.हे आव्हान ‘इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल’ ही संस्था पेलेल याची खात्री वाटते.स्वमग्न बालकांना लागणाऱ्या विशेष सुविधाचे केंद्र ‘इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल’ ने औंध मध्ये उभारले ही चांगली गोष्ट आहे.शासन सुद्धा दिव्यांग मुलांसाठी काम करीत आहे.स्वयंसेवी संस्थांनी, खासगी क्षेत्राने पुढे यावे,योगदान द्यावे.प्रत्येक जिल्ह्यात ऑटिस्टिक सेंटर झाले पाहिजे,अशी गरज आहे’.
स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या बालकांची विशेष काळजी विविध उपक्रमातून घेतली जात असल्याचे डॉ.अंकिता संघवी यांनी सांगितले. डॉ.अंकिता संघवी या बालकल्याण संस्थेत ‘ अर्ली इंटरव्हेंन्शनीस्ट ‘ म्हणून विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी कार्यरत आहेत.या क्षेत्रातील अनुभव यावेळी त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,’इनोव्हेटिव्ह टाइम्स स्कुल मध्ये ऑटिस्टिक मुलांसाठी विशेष सुविधा असलेले केंद्र उभारण्यात आले आहे.शिवाय सर्वसाधारण (नॉर्मल) बालकांसाठी डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी शिक्षणाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
स्वमग्न मुलांसाठी शिक्षण विशेष पद्धती
स्वत:च्याच विश्वात, विचारात रमणे म्हणजे स्वमग्नता ( ऑटीझम ). ही स्वमग्न मुले नेहमी समाजापासून, अवतीभवतीच्या वातावरणापासून अलिप्त राहतात.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांफार संवाद नसतो. भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची समस्या स्वमग्न मुलांमध्ये जाणवते.
स्वमग्न मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो तर वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करावा लागतो. या शाळांमध्ये प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे आयईपी तयार करण्यात येतो. त्यानंतर प्रायमरी गोल ठरवून त्यावर काम करण्यात येते. विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना शिकवले जाते.
स्वमग्न मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या थेरपीज चा वापर केला जातो त्या म्हणजे स्ट्रक्चर्ड टिचिंग, चित्रबोली, इंद्रियानुभवाचे एकत्रीकरण पद्धती या सर्व पद्धतींनी विशेष मुलांना शिकवून त्यात त्यांना वैयक्तिक कौशल्ये, सूक्ष्मकारक कौशल्ये, संगीत उपचार पद्धती, एस.आय. पद्धती, चित्रकला पद्धती, भाषाविकास पद्धती, शैक्षणिक विकास पद्धती विविध आणि कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासाठी होतो. आठवड्यातून दोन दिवस संगीत उपचार पद्धती, दोन दिवस ऑक्युपेशनल थेरपी, दोन दिवस स्पीच थेरपी, तसेच वर्तन समस्यांवर वन टू वन रेशिओमध्ये काम करून मुलांना प्रशिक्षित करणे अनिवार्य बनते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-08-at-3.40.15-PM-1-1024x467.jpeg)