Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेसाठी शिवसेना मैदानात ; पक्षाच्या बैठकांना सुरूवात

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकां संपताच राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक़ांची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणूकीसाठी विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असून विविध विकासकामे घेऊन नागरिकांपर्यंत पोचण्याच प्रयत्न प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून सुरू असून हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांची आढावा बैठक शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

शिवसेनेकडून महापालिका निवडणूकीसाठी महायुतीत ४० ते ४५ जागांची मागणी केली जाणार आहे. त्या अंतर्गत शहरातील शिवसेनेचे प्रभाग निश्चित करण्यासाठी पक्षाकडून स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. यावेळी आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी संघटन बांधणी, पक्षाचे धेय्य धोरणे, पक्षाची कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी तन मन लाऊन काम करणे आवश्यक असल्याचे नाना भानगिरे यांनी या बैठकीत सांगितले.

हेही वाचा    –      क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा 

तसेच शहरात विविध ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या जोरावर नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले तसेच यामध्ये शिवसैनिकांनी देखील अथक परिश्रम घेतले त्याबद्दल नाना भानगिरे यांनी सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीने विधानसभा निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. लाडकी बहिण योजनेसह विविध योजना जनतेसाठी राबवल्या गेल्या त्याचा लाभही अनेकांना झाला. आगामी महापालिका निवडणुकीत या सर्व योजना आणखी प्रभावीपणे जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत.

– प्रमोद नाना भानगिरे, (शहरप्रमुख, शिवसेना पुणे शहर)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button