ताज्या घडामोडीपुणे

ऋषिकेश सुरेश जवळ याचे सी.ए. परीक्षेत उज्वल यश

जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील युवकाने समाजापुढे ठेवला नवा आदर्श....

पुणे : मेढा, ता जावळी येथील जवळवाडी सांगवी गावचा सुपुत्र चि. ऋषिकेश सुरेश जवळ याने सनदी लेखापाल अर्थात सी.ए. परीक्षेत उज्वल यश संपादित करून आपल्या गावाबरोबरच पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये एक आदर्श निर्माण करून दिला. त्याच्या यशामध्ये जवळ व सुर्वे कुटुंबाचा सिंहांचा वाटा आहे. देशातील सर्वात अवघड असणारी व्यावसायिक परीक्षा सनदी लेखपाल उत्तीर्ण होणे म्हणजे जिकरीची बाब. परंतु या युवकाने आपल्या परिश्रमाने सदर परीक्षेत आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत उत्तम यश संपादन केले. आपल्या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Rishikesh, Near Suresh, CA, Exams, Success, Jawali, Remote, Youth, Adarsh,
Rishikesh, Near Suresh, CA, Exams, Success, Jawali, Remote, Youth, Adarsh,

अतिशय खडतर शैक्षणिक प्रवास…
ऋषिकेशचा जन्म जावली तालुक्यातील घरातघर सांगवी या गावी झाला. आपल्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही सुखसुविधा उपलब्ध नसल्याने त्याने सुरुवातीला सांगवीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेला हा विद्यार्थी तल्लख बुध्दीमत्तेच्या बळावर वेगवेगळ्या विषयांमध्ये चांगले प्राविण्य मिळवू लागला. त्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षण गावाजवळ असणाऱ्या गांजे या विद्यालयातून पूर्ण केले. वडिल माथाडी कामगार व नंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते.

वडिलांचा विश्वास सार्थ करून दाखवला…
आपल्या मुलाची शिक्षणामध्ये असलेली प्रगती पाहून त्याला उच्च शिक्षण मिळायला हवे, यासाठी वडिलांनी गावांतील शाळेतून दाखला काढून मुंबई येथील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याही ठिकाणी ऋषिकेशने आपल्या कलागुणांना वाव देत चांगल्या प्रकारे अभ्यास करून नेहमी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ करून दाखवला. त्यानंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी त्याला मुंबईमधील नामांकित के. सी. कॉलेज चर्चगेट येथे त्याला प्राप्त झालेल्या उत्तम गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला. सदर प्रवेश मिळवल्यानंतर अहोरात्र मेहनत करून त्याने देशातील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल परीक्षेमध्ये यश मिळवून आपल्या परिवारासोबतच आपले गाव, पंचक्रोशी व संपूर्ण जावली तालुक्यात बहुमान मिळवला. आईवडिलांची प्रेरणा तसेच वडिलधाऱ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अहोरात्र परिश्रम घेत जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनतीच्या जोरावर ऋषिकेश सी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाला. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला मिळालेले हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. कौतुकास्पद आहे.

शैक्षणिक प्रवासात यांचे लाभले मार्गदर्शन…
या यशानंतर त्याच्या गावातील सर्व वडीलधाऱ्या व कॉलेजमधील शिक्षक बंधू-भगिनींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सदर उज्वल यशाबद्दल जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषदेचे आ.शशिकांतजी शिंदे, राजेंद्र रांजणे, एकनाथ पवार, रामचंद्र पवार शंकर जवळ,विकास पवार, सुर्यकांत पवार, सुनील पवार, सचिन पवार, प्रशांत पार्टे, रविंद्र पवार,चंद्रकांत पवार, नितीन पवार, अभिषेक पवार व मुकुंद सुर्वे इ.मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच या सर्व शैक्षणिक प्रवासात श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शामराव देशमुख व सचिव सौ. रोहिणी देशमुख तसेच विद्यानिकेतन स्कूल चाकणचे प्राचार्य श्री. दीपक शिंदे (मामाचा मुलगा) व श्री लहू सुर्वे (मामा) यांनी मार्गदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button