Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे, खडकी छावणी परिषद महापालिकेत सामील करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पुणे आणि खडकी छावणी परिषद पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी दोन्ही छावणी परिषदांचा पालिकेत समावेश केला जात असल्याचे मंत्री मोहोळ बुधवारी (२१ जानेवारी) म्हणाले.

पुणे महानगरपालिका राज्यात आकाराने मोठी असलेली महापालिका आहे. दोन्ही छावणी परिषदांचा समावेश झाल्यानंतर पालिकेचा विस्तार होण्यासह जबाबदारी वाढणार आहे.

“उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात या हेतूने पुणे आणि खडकी छावणी परिषदांचा महापालिकेत समावेश केला जात आहे. छावणी परिषदांचा महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे माझी जबाबदारी आहे”, असे मोहोळ समावेशाच्या प्रक्रियेवर म्हणाले. अशा प्रकारचे समावेश देशभरात सुरु असल्याचे मंंत्री मोहोळ यांनी सांगितले.

नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे महानगरपालिकेचे विभाजन करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना सध्यातरी विभाजनाची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईत सर्व व्यवस्थितपणे हताळले जात असताना पुण्यात होणार नाही का? भौगोलिकदृष्ट्या पुणे मुंबईच्या तुलनेत मोठं आहे. पण, सध्या गोष्टी हताळल्या जाऊ शकतात. भविष्यात याबाबत विचार केला जाऊ शकतो”, असे मोहोळ म्हणाले.

हेही वाचा –अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून ते ३१ मार्च पर्यंत जनतेसाठी होणार खुले, प्रवेश विनामूल्य; जाणून घ्या नोंदणी कुठे करणार….

झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर ताण येत आहे, असे मोहोळ यांनी नमूद केले. दरम्यान, पाणी चोरी अथवा गळतीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता मुळशी धरणाचा पर्यायही विचारात घेतला जाणार असल्याचे मोहोळ म्हणाले.

“पुण्यातील जनतेने महापालिकेच्या निवडणुकीत विकासासाठी भाजपाला बहुमत दिले आहे. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करणे आता आमची जबाबदारी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करणे, नदी सुधारणा आणि सुशोभीकरण याला प्राधान्य दिले जाणार आहे”, असे मंत्री मोहोळ म्हणाले.

“शहरात राजकीय बॅनरबाजी न करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शहर भाजपा याचे पालन करत आहे. आम्हाला शहर बॅनरमुक्त हवं आहे. शहरातील बेकायदेशीर बॅनर हटविण्याची सूचना पालिका प्रशासनाला दिली आहे. अवैध असणारा बॅनर कोणीही लावलेला असो तो हटविण्यात यावा”, अशी सूचना दिल्याचे मोहोळ म्हणाले. पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी ३०० एकर जमिनीचे अधीग्रहण लवकरच सुरु होणार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button