अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून ते ३१ मार्च पर्यंत जनतेसाठी होणार खुले, प्रवेश विनामूल्य; जाणून घ्या नोंदणी कुठे करणार….

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या २ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुले होणार आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आठवड्याचे ६ दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात कोणालाही या उद्यानाची शोभा पाहता येईल. राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. देशाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा विविधता का अमृत महोत्सव येत्या ६ मार्चपासून अमृत उद्यानात साजरा करण्यात येणार आहे.
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६ (शेवटचा प्रवेश: संध्याकाळी ५:१५)
बंद : सोमवार आणि ४ मार्च (होळी) रोजी बंद राहिल
प्रवेश : सर्वांसाठी मोफत प्रवेश
हेही वाचा –29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार; संपूर्ण राज्याचं लक्ष
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 3 फेब्रुवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. आठवड्यातून सहा दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 (शेवटचा प्रवेश संध्याकाळी 5.15 वाजता) दरम्यान लोक या उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान देखभालीचे दिवस असलेल्या सोमवारी तसेच होळीनिमित्त 4 मार्च रोजी बंद राहील.
उद्यानासाठी बुकिंग आणि प्रवेश मोफत आहे. https://visit.rashtrapatibhavan.gov.in/ वर बुकिंग करता येईल. वॉक-इन अभ्यागतांसाठी प्रवेश बिंदूजवळ स्वयं-सेवा अभ्यागत नोंदणी कक्ष उपलब्ध असतील.
सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश आणि निर्गमन राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून असेल, जिथे नॉर्थ अव्हेन्यू राष्ट्रपती भवनाला जोडले आहे. अभ्यागतांच्या सोयीसाठी, सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 पर्यंत शटल बस सेवा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत दर 30 मिनिटांनी उपलब्ध असेल. ‘अमृत उद्यानासाठी शटल सेवा’ या बॅनरद्वारे शटल बसेस ओळखता येतील.




