पुण्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका
![पुण्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sex-racket_1500360923.jpeg)
पुणे |
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची सुटका केली तर हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. तर तीन दलालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल बाबासाहेब बेलदरे (वय 36) आणि विक्रम करण सोनार (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आंबेगाव बुद्रुक परिसरातील ब्रम्हा लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. त्यावेळी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशातील दोन तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. त्या तरुणाची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याठिकाणी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेश पुरानीक करत आहे.