ताज्या घडामोडीपुणे

पुणे आरटीओकडून २०२५-२६ मध्ये महसूल १९२२.१२ कोटी रुपये वसूल

उद्दिष्टापेक्षा जास्त १०१.४२ टक्के कामगिरी

पुणे | प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे मार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसूली, अंमलबजावणी व अनुषंगिक कामकाजाबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या १८९५.१७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत कार्यालयाने १९२२.१२ कोटी रुपये महसूल वसूल करत १०१.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

रस्ता सुरक्षा अंमलबजावणी अंतर्गत तपासणीत दोषी आढळलेल्या ६१ हजार ५०९ वाहनांवर ई-तपासणी कारवाई करण्यात आली असून, त्यातून २५.६८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक अनुज्ञप्ती व ५ हजार ५८४ आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा     :              ‘पुणे ग्रँड टूर 2027’ ची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा 

थकीत मोटार वाहन करापोटी ३२.२३ कोटी रुपये व पर्यावरण करापोटी ९.८० कोटी रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे. ई-लिलावाद्वारे १९३ वाहनांच्या विक्रीतून १.०६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ लाख १८ हजार ८४४ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या असून, ३ लाख ४५ हजार ५४३ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ५६ हजार १७२ पसंती क्रमांक आरक्षित करून त्यातून ७३.७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्यात आलाअसल्याची माहिती प्रादेशिक परिहवन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button