breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार

पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्‍पवयीन आरोपीला जामीनावर सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. याबाबतची माहिती पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने X ‍वर पोस्ट केली आहे.

पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्‍पवयीन आरोपीला २५ जून रोजी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने शनिवारी पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे.

हेही वाचा – तुकोबांच्या पालखीला उद्योगनगरीतून निरोप

मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कारने १९ मे रोजी पुण्यातील दोन आयटी इंजिनिअरला चिरडले होते. संशयित आरोपीच्‍या सुटकेसाठी त्‍याच्‍या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोन्‍ही बाजूंच्‍या युक्‍तीवादानंतर न्‍यायालयाने २५ जून रोजी अल्‍पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता.

पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने तो मद्यपान करत असल्याची कबुली दिली आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे मुलगा दारु पित असल्‍याचे त्‍याच्‍या वडिलांना माहित होते. तरीही त्‍यांनी त्‍याला अलिशान पोर्शे कार चालविण्‍यास दिली असल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील, ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह हॉटेल मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेलचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल याला २१ मे रोजी अटकही करण्‍यात आली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button