ताज्या घडामोडीपुणे
पुणे- मुंबई एक्सप्रेस वे ठप्प; केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई लेन पूर्ण बंद
![Pune-Mumbai Expressway jammed; Mumbai lane completely closed due to overturning of chemical tanker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220326-WA0067.jpg)
लोणावळा शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे.
सदरचे केमिकल रस्त्यावर उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबई बाजुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पाॅईटपर्यत वाहनांच्या रांगा गेल्या आहेत.