Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-जोधपूर एक्सप्रेसचा चिंचवड रेल्वे स्थानकावर दैनंदिन थांबा!

राजस्थानी समाज बांधवांना मोठा फायदा : चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने स्वागत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

जोधपूर-पुणे दैनदिन रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आल्यानंतर शनिवारी (दि. ३) सायंकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वेचे आगमन झाले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने रेल्वेचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

चिंचवड प्रवासी संघाने ही एक्सप्रेसगाडी दैनदीन चालू व्हावी, यासाठी अथक प्रयत्न केले. रेल्वे मंत्री, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक आदींना वेळोवेळी लेखी निवेदने दिली. प्रथम सप्ताहात एक दिवस, नंतर तीन दिवस व आता दैनदिन थांबा चिंचवड रेल्वे स्थानकावर येता-जाता मिळाला आहे. या थांब्यामुळे शहरातील राजस्थानी समाज बांधव, वसई रोड, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी जाणार्‍या व तेथून येणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे. ३ मे रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

शनिवारी (दि. ३) सायंकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसचे आगमन झाले. तेथे इंजिनाला स्थानक प्रमुख शोभा वर्मा यांच्यासह चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मनोहर जेठवानी, मुकेश चुडासमा यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. शमशुद्दीन भालदार, मनोज चौगुले, आत्मप्रकाश मटाई, पं. हरेश शर्मा, राजस्थान समाज बांधवांचे प्रमुख हरीश वर्मा, मालाराम माळी आदींनी घोषणा देत प्रवाशांना पेढे, लाडू वाटून एक्सप्रेसचे स्वागत केले. यावेळी चिंचवड रेल्वे स्थानकावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सरवदे, दत्ता इंदीलवार, रेल्वे तिकीट तपासणीस लता दुधाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा   :  आला रे पाऊस आला..केरळमध्ये १ जून रोजी दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस तसेच बारामती – कर्जत पॅसेंजर, पुणे – लोणावळा दरम्यान एक लोकल दुपारची बंद केली आहे. कोरोना संकट काळापासून बंद केली. त्या सर्व सुरू करण्यात याव्यात. पिंपरी – चिंचवड शहरात तसेच तळेगाव परिसरात सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असून त्यांना गावाकडे येण्या जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. त्याना रस्ते मार्गावर अवलंबून रहावे लागत आहे, अशी वैâफीयत मांडली.

पिंपरीचे मनोहर जेठवाणी यांनीही पिंपरी हे व्यापार्‍याच्या दृष्टीने महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्यामुळे येथे कोरोना काळापासून बंद केलेली मुंबई ते कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस त्वरीत सुरू करावी, अशी मागणी केली. चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख शोभा वर्मा म्हणाल्या, पुणे – जोधपुर एक्सप्रेस गाडीला पाच थ्री टायर्स स्लीपर कोच, चार जनरल बोगी, चार एसी थ्री टायर, एक टू टायर स्लीपर कोच, एक गार्ड वॅगन व एक पावर कार अशा बोगी आहेत. या रेल्वेसेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button