पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधी विटी दांडू खेळून पुण्यात अनोखे आंदोलन
![Pune City District Congress Committee's unique agitation in Pune by playing Viti Dandu against potholes on roads](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Unique-agitation-1.jpg)
पुणे – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज पुण्यात सत्ताधारी भाजप पक्षाने जे पुण्यातील रत्यावरील जे खड्डे बुजविले नाहीत त्या विरुद्ध पुणे शहर काँग्रेस पक्षातर्फे आज टिळक रोडवरील टिळक स्मारक चौकात खड्ड्याविरोधी आंदोलन केले.
सत्ताधारी भाजपने खड याविरोधी केलेल्या कामाचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. काँग्रेस पक्षाने रस्त्यात विटी दांडू चा खेळ खेळला. येरे येरे पावसा आम्हाला मिळतो पैसा, पाऊस जरी आला छोटा तरी खड्डा पडतो मोठा” पुणे गेले खड्यात सत्ताधारी भाजप पक्षाचा निषेध असो अशा आंदोलनाच्या वेळी काँग्रेस नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री, शरद रणपिसे आमदार, अभय छाजेड़ सरचिटणीस काँग्रेस पक्ष, संजय बालगुडे सचिव काँग्रेस पक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. संजय बालगुडे म्हणाले, मी काल संध्याकाळी टिळक रोड वरून जात असताना मला या भागात खड्डे दिसले त्यामुळे मी काल संध्याकाळी टिळक चौकात आंदोलन करायचे ठरविले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहाटेपर्यंत येथील खड्डे बुजविले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अजून किती खालच्या पातळीवर जायचे ठरवले आहे.
सत्ताधारी भाजप पक्षाने या रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत त्यामुळे अजून किती जणांचा बळी घ्यायचा हे भाजप ने ठरविले आहे 2017,2018 साली आम्ही हे खड्डे बुजवले नव्हते म्हणून आंदोलन केले होते.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदार संघातून निवडून आले आहेत आम्ही त्यांना व खासदार गिरीश बापट यांना अनेक आम्ही चष्मा देणार आहोत. त्यातून आम्ही तुम्ही पुणे शहराची कशी वाट लावली हे दाखवणार आहोत सत्ताधारी भाजप पक्ष रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अजुन किती जणांचा जीव घेणार आहे कुणास ठाऊक अरे तेरे रस्ते सिमेंटचे पक्के बनवले पाहिजेत आज आंदोलन पुणेकर यांच्या जीव वाचवण्यासाठी आम्ही करत आहोत.