breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विमानतळ वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विमानतळ वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार न्याती एम्प्रेस प्रवेशद्वार ते क्लोवर अॅक्रोपॉलिस सोसायटी प्रवेशद्वारापर्यंत सुमारे ८० मीटर व सांबर हॉटेल लेन (विमाननगर लेन नंबर २) ते शिवहारी सोसायटी प्रवेशद्वारापर्यंत सुमारे २५ मीटर फक्त चारचाकी वाहनांकरिता अॅंग्युलर पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. ईस्ट कोर्ट ए प्रवेशद्वार ते सांबर लेन पर्यंत सुमारे २५ मीटर फक्त दुचाकी सिंगल लाईन पार्किंग तर पंचशिल बिजनेस पार्क एक्झीट द्वार ते ३६५ इन्विटेशन हॉटेलपर्यंत सुमारे ५० मीटरपर्यंत फक्त दुचाकी करीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

रॉयल टॉवर्समधील युनियन बँक ते पुना स्वीट दुकानापर्यंत सुमारे २२० मीटरपर्यंत फक्त दुचाकीसाठी तर पुना ड्रग्स हाऊस ते भिमरत्न ग्रुपपर्यंत सुमारे २२० मीटर फक्त अॅंग्युलर कार पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते संघर्ष चौक यादरम्यान नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेपासून ते श्री बालाजी गिफ्ट दुकानापर्यंत सुमारे १८० मीटर पी १ पी २ पार्किंग करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ७ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button