ताज्या घडामोडीपुणे
कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद
![Provision of Rs. 1 crore for development of Kranti Stambha premises at Koregaon-Bhima](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/1200px-Bhima_Koregaon_Victory_Pillar-e1637723405996.jpg)
पुणे | शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, ‘दरवर्षी एक जानेवारीला लाखो भीम अनुयायी क्रांतिस्तंभाला मानवंदना करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुशोभिकरण आणि विकासकामे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.’