आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीचे आयोजन
![Organized cycle rally on Sunday for health and environment awareness](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-08-at-9.41.40-AM-780x470.jpeg)
पुणे : आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी रविवारी (ता. ९) सकाळी ७ ते ९ या वेळेत सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सच्या पुढाकाराने आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात येत आहे. सारसबाग, टिळक रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, संभाजी उद्यान असा या रॅलीचा मार्ग आहे, अशी माहिती समन्वयक अनिल मंद्रुपकर यांनी दिली. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला आहे, असेही मंद्रुपकर यांनी सांगितले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-08-at-9.41.43-AM-723x1024.jpeg)
कार्बन उत्सर्जन रोखणे, निसर्गाचे संवर्धन, प्रदूषण कमी करणे, स्वच्छ आणि निरोगी जीवन याबाबत जागृती केली जाणार आहे. ‘जॉईन ग्रीन रिव्होल्यूशन स्टॉप पोल्युशन’ हा नारा देत ही सायकल रॅली शहराच्या मध्यवर्ती भागात फिरणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी अनिल मंद्रुपकर (९८८११२८३०३), मयूर बागुल (९०९६२१०६६९) किंवा के. के. गुजराती (९८२३१४९२२१) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.