breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘सर्वांसाठी घर’ या मोहीमेतून पश्चिम महाराष्ट्रात ‘म्हाडा’कडून गृहस्वप्न साकारण्याची संधी

पुणे |महाईन्यूज|

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ‘सर्वांसाठी घर’ या धोरणांतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) २ हजार ८९० सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, १४ मेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या सदनिकांची ऑनलाइन सोडत २९ मे रोजी काढण्यात येणार आहे.

या सदनिकांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत ऑनलाइन करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर हे सहभागी झाले होते. ‘’म्हाडा’ची लॉटरी योजना ही पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असून, अफवा आणि फसवणुकीला बळी पडू नका. कोणी फसवणुकीचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरूद्ध तक्रार करावी,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

दरम्यान, या दोन हजार ८९० सदनिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या भागांतील आहेत. ‘म्हाडा’च्या योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका आहेत. यापूर्वी ‘म्हाडा’ने जानेवारी महिन्यात पाच हजार ६५७ घरांची सोडत काढली होती.

अशी आहे लॉटरी प्रक्रिया…

– अर्ज करण्याचा कालावधी १३ एप्रिल ते १४ मे रात्री बारा वाजेपर्यंत

– ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत १५ मे

– आरटीजीएस किंवा एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत १६ मे

– अर्ज भरणाऱ्यांची यादी प्रसिद्ध २६ मे

– अर्ज भरणाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध २८ मे

– ऑनलाइन लॉटरी सोडत २९ मे रोजी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button