ताज्या घडामोडीपुणे

निगडीतील घरकुल, धोकादायक इमारती आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; आमदार महेश लांडगे यांच्याकडे नागरिकांची मागणी

जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना, पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारती व आ.भा. साठे वसाहतीतील नागरी सुविधांचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्याची मागणी भाजपा कार्यकर्ता सचिन काळभोर यांची महापालिकेकडे व आमदारांकडे तातडीच्या कारवाईची विनंती

निगडी : नागरिकांच्या दीर्घ प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या अपेक्षेने प्रभाग १३ मधील कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे तातडीची दखल घेण्याची मागणी केली आहे. भाजपा कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे घरकुल वाटप, धोकादायक इमारतींचे स्थलांतर आणि साठे वसाहतीतील सुविधा या तिन्ही गंभीर प्रश्नांवर अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली आहे.
१. जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना – १५ वर्षे झाली, घरकुल अजूनही मिळाले नाही

निगडी सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेंतर्गत उभारलेल्या नऊ इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन १५ वर्षे उलटली, मात्र पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यात विलंब होत आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असला तरी, पीसीएमसी प्रशासन शांत बसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांना सातत्याने पायपीट करत असून, आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात हा प्रश्न मांडून तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

२. पीसीएमसी कॉलनीतील ९ धोकादायक इमारती – ७७४ कुटुंबे मृत्यूच्या छायेत

पीसीएमसी कॉलनीमध्ये असलेल्या ९ इमारतींमध्ये तब्बल ७७४ कुटुंबे राहत असून त्या इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. छतावरील स्लॅब कोसळणे, भिंती-खिडक्या तुटणे, पाया कमकुवत होणे अशा गंभीर समस्या नागरिकांना दररोज सामोरी येत आहेत.

इमारती कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता, मात्र महापालिकेकडून स्थलांतराचा कोणताही ठोस निर्णय नाही.

या संदर्भातही आमदार लांडगे यांनी अधिवेशनात ठोस भूमिका घ्यावी आणि नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

३. आण्णा भाऊ साठे वसाहत – ५० वर्षे उलटली, तरीही सुविधांचा अभाव

निगडीतील आण्णा भाऊ साठे वसाहत स्थापन होऊन ४५–५० वर्षांनंतरही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी नोंदवली आहे.

संडास-बाथरूमची कमतरता

सांडपाणी व गटार व्यवस्थेचा अभाव

व्यायामशाळा, ओपन जिम नाही

भाजी मंडई, आरोग्य केंद्राची सुविधा नाही

रेड झोन प्रकल्पातील बाधित जागेवर या वसाहतीचे पुनर्वसन करण्यात आले असून, २५६ फोटो पास धारक आजही मूलभूत सुविधांशिवाय आहेत.

हेही वाचा :  सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा

या प्रश्नांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला असून, आमदारांनी हा विषय तातडीने उपस्थित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निगडी भागातील प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात – नागरिकांची अपेक्षा

सर्व प्रश्नांचा तपशील देताना भाजपा कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात तीनही मुद्द्यांवर ठोस पावले उचलावीत अशी नम्र विनंती केली आहे.
नागरिकांचे जनजीवन सुरक्षित, सन्मानपूर्वक व सुविधा-संपन्न व्हावे, यासाठी प्रशासनाने तातडीने मैदानात उतरावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button