पुणे शहरात नवी नियमावली लागू; काय सुरू, काय बंद?
![97% of patients in Mumbai are free from corona; 2% of citizens lost their lives](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1-6.jpg)
पुणे – राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. शिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठिकठिकाणी जुन्या नियमावलीमध्ये बदल करण्यात येत आहेत. पुणे शहरातदेखील आजपासून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे शहराची लेव्हल 3 मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.
जाणून घेऊया पुणे शहरात नेमकं काय सुरू आणि काय बंद?
– सर्व अत्यावश्यक सेवांतर्गत दुकाने आठवड्यील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार
– अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू, तर शनिवार-रविवार पुर्णपणे बंद राहणार
– मॉल्स, सिनेमागृह पूर्णपणे बंद
– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार
– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनींग आठवड्यातील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार
– खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार
– अत्यावश्यक सेवेसंबंधी शासकीय कार्यालये शंभर टक्के क्षमतेने सुरू राहतील