ताज्या घडामोडीपुणे

नागपंचमी निमित्त विद्यानिकेतन व विद्याव्हॅली स्कूल मध्ये सर्प समज, गैरसमज व उपाययोजना या कार्यक्रमांचे आयोजन…

विद्यानिकेतन स्कूल चाकण या प्रशालेमध्ये नागपंचमी सण कसा साजरा करावा याचे मार्गदर्शन

चाकण : श्री.एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन स्कूल चाकण या प्रशालेमध्ये नागपंचमी हा सण कसा साजरा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम ९ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यालयाच्या प्रांगणा मध्ये घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी वसुंधरा बहुउद्देशीय संस्था चाकणचे कार्याध्यक्ष मा. श्री.श्रीराम पाटील, मनीष भुजबळ, निरंजन भुजबळ व संस्थेच्या संचालिका व कन्या विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका विजयाताई पाटील यांची प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका म्हणून उपस्थिती होत्या. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर विद्या निकेतन व विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये नागपंचमी दिनाचे औचित्य साधून ‘सर्प समज, गैरसमज व उपाययोजना’ या संदर्भात विशेष माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम दर वर्षी प्रमाणे करण्यात आला. सदर कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आला. सर्व प्रथम सर्पा विषयी माहिती त्यानंतर सर्प दंशानंतर घ्यावयाची काळजी व सर्प कसा शेतकऱ्याचा मित्र आहे याची माहिती व सर्प संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विषारी, निमविषारी व बिनविषारी सापाच्या जाती दाखवण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी बिनविषारी साप हाताळले.
तसेच श्रीराम पाटील यांनी नाग या सापाविषयी माहिती दिली व सापाच्या वेगवेगळ्या प्रकार व प्रत्यक्षात त्या सापांना दाखवून त्यांची माहिती दिली. या पैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या जातीच्या सापांची छायाचित्रे दर्शविले. तसेच सापांचे वैज्ञानिक कारण समजू घ्या व सापाला २६० दात असतात त्यात दिनचर व निशाचर अश्या सापांची माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
तसेच पुढील प्रथमोपचार मार्गदर्शन श्रीराम पाटील व मनीष भुजबळ यांनी केले आणि त्यांच्या भाषणातून साप दंशानंतर आपण कोणते प्रथम उपचार केले पाहिजे व ते प्रत्यक्षात त्यांनी करूनही दाखवली.
संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख व सचिव रोहिणी देशमुख तसेच
विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती रणदिवे व दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत दीपक शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता विद्यालयातील शिक्षिका सौ.सुजाता ढेरंगे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button