Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडसाठी अभिमानास्पद बाब.. महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; महापौरांकडून सन्मान

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी भांडारपाल भास्कर रिकामे यांचे चिरंजीव डॉ. केतन भास्कर रिकामे यांना ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोरकडून एस्ट्रोफिजिक्स विषयात पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,अभिषेक फुगे, अतुल आचार्य,हनुमंत लांडगे आदी उपस्थित होते.

निगडी येथील रहिवासी असलेले डॉ. केतन रिकामे सध्या रमन रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर येथे ब्लॅक होल आणि अवकाशातील घटकांमधून उत्सर्जित होणाऱ्या क्ष-किरणांच्या अभ्यासासाठी उपकरण विकसित करण्यावर संशोधन करत आहेत. त्यांनी विकसित केलेले ‘एक्स-रे पोलारिमीटर’ हे उपकरण जानेवारी २०२४ मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनायझेशनच्या XPoSat उपग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाद्वारे अवकाशातील ब्लॅक होलचा सखोल अभ्यास करण्याचे कार्य सुरू आहे.

हेही वाचा –  भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

या प्रकल्पामध्ये डॉ. केतन यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत काम करत उपकरणाची निर्मिती, चाचणी आणि उपग्रहात बसविण्यापर्यंतचा महत्त्वाचा सहभाग नोंदविला आहे. या उपकरणाच्या माध्यमातून अवकाशातून येणाऱ्या क्ष-किरणांचे संकलन करून त्यावर संशोधन केले जात आहे. डॉ. केतन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्यामध्ये एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे येथून बी.एस. व एम.एस. पदवी प्राप्त केली असून, त्यानंतर इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्स तसेच कॅलिफॉर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विविध संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. याशिवाय, गेल्या पाच वर्षांपासून ते रमन रिसर्च इन्स्टिट्यूट येथे डॉ. बिश्वजित पॉल व डॉ. व्ही. जितेश यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशीही त्यांचे संशोधन कार्य संलग्न आहे.

डॉ. केतन यांच्या यशामागे त्यांचे वडील भास्कर रिकामे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भांडारपाल म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावत आपल्या कुटुंबाला शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून दिली. त्यांच्या कष्ट व संस्कारांमुळेच डॉ. केतन यांनी आज जागतिक पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button